नागपूर:महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधासनभेत केली. यापुढील हिवाळी अधिवेशन नागपुर येथे होईल. नागपूर येथे गुरुवार 7 डिसेंबर 2023 पासून हे अधिवेशन सुरु होईल अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी शुक्रवारी तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन संपवून विधानसभेचे कामकाज तहकूब केले.
नरिमन पॉइंट येथील विधानभवन संकुलात सोमवार (१७ जुलै) ते ४ ऑगस्टपर्यंत तीन आठवडे अधिवेशन चालले.माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याशी संबंध तोडल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन होते. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह भाजप-शिवसेना युतीशी हातमिळवणी केली.
भेसळयुक्त बियाणे, निकृष्ट दर्जाचे किंवा चुकीचे ब्रँड असलेले बियाणे, खते किंवा कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याचे उद्दिष्ट असलेले विधेयक महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी विधानसभेत मांडले.