Published On : Fri, Aug 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

देशात जातीय तेढ निर्माण करून धर्माधर्मांमध्ये फूट पाडण्याचे कार्य भाजप सरकारकडून सुरू; विलास मुत्तेमवारांचे नागपूरात विधान

शहर जिल्हा काॅग्रेस कमेटीच्या कार्यकरिणीची बैठक संपन्न
Advertisement

नागपूर: शहर जिल्हा काॅग्रेस कमेटीच्या कार्यकारिणीची बैठक आज देवडिया काॅग्रेस भवन कार्यालयात पार पडली. या बैठकीचे नेतृत्व आमदार विकास ठाकरे यांनी केले. या माजी केंद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार,प्रदेश सोशल मिडिया सेल अध्यक्ष व महासचिव विशाल मुत्तेमवार,प्रदेश उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष व महासचिव अतुल कोटेचा, प्रदेश सचिव गिरीश पांडव,प्रधान महासचिव डाॅ.गजराज हटेवार,रमन पैगवार,प्रा.दिनेश बानाबाकोडे,प्रशांत धवड,उमेश शाहू, सेवादलाचे अध्यक्ष प्रविण आगरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बोलताना माजी केंद्रिय मंत्री विलासराव मुत्तेमवार राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.

देशात जातीय तेढ निर्माण करून धर्माधर्मांमध्ये फूट पाडण्याचे कार्य भाजप सरकारकडून सुरू असल्याचे मुत्तेमवार म्हणाले. पक्षाच्या बळकटीसाठी सर्वांनी युद्ध पातळीवर काम करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.तसेच २१ तारखेपासून ते 29 तारखेपर्यत ब्लाॅक निहाय,पदाधिकारी,फ्रन्टल प्रमुख,सेलचे पदाधिकारी यांना साय 6 ते 7.30 वाजताच्या दरम्यान बोलावून देवडिया भवनात चर्चा करण्यात येईल,अशी माहितीही त्यांनी दिली.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरचे शहर अध्यक्ष व आ. विकास ठाकरे यांनी आगामी लोकसभा,विधानसभा,मनपा निवडणूक जिंकायची असेल तर प्रत्येक बुथ वर 10 कार्यकर्त्यांची टिम मजबूत करने गरजेचे आहे, असे म्हटले.येत्या 20 तारखेला स्व राजीव जी गांधी यांची जयंती नाना पटोले,विजय वडट्टीवार,प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत साजरी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

तसेच 22 तारखेला प्रदेश अध्यक्ष रविभवन येथे जनसंवाद पदयात्रेच्या पूर्व तयारीची बैठक घेणार असून पदयात्रेचा 6 ही विधानसभा निहाय रुट तयार करतील.त्यांनतर 03 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यत लोकसंवाद पदयात्रा काढण्याकरीता आपण तयारी करावी. शहर काॅग्रेसच्या पदाधिका-यांनी 2 व्हीलर व 4 व्हिलर गाडीवर काॅग्रेस पक्षाचे तिरंगा स्ट्रिकर लावावे, असे आवाहनही ठाकरे यांनी बैठकीत केले.

विशाल मुत्तेमवार यांनी जनसंवाद पदयात्रा पूर्वी महागाई, बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार,देशात वारंवार घडत असलेल्या जातीय व धर्मिक दंगली अशा विविध मुद्दयाचे पत्रक तयार करुन नागरिकांना वाटल्यास नागरिक जमा होवून पदयात्रेला भव्य स्वरुप प्राप्त होईल,असे म्हटले आहे.

दरम्यान बैठकीमध्ये महेश श्रीवास,मिलींद दुपारे,प्रा.प्रकाश ढगे,ज्ञानेश्वर ठाकरे,सुनिता ढोले,वसीम खान,विवेक निकोसे,हरीष खंडाईत,सुनिल जाधव,डाॅ.मनोहर तांबुलकर,अशोक निखाडे,दिनेश तराळे,पंकज निघोट, मोतीराम मोहाडीकर, गोपाल पटटम, हरीश खंडाईत,आकाश तायवाडे, प्रमोद ठाकुर,निखिल धांडे, लंकेश ऊके राज खत्री,रविद्र भावे,शिवनाथ शेडे,सुरज आवळे, अभय रणदिवे,वंदना मेश्राम,भास्कर चाफले,पंकज थोरात,वासुदेव ढोके,अजय नासरे,चंदू वाकोडीकर,अनिल शर्मा,गणेश शाहू,श्रीकांत ढोलके,कुमार बावनकर,किशोर गीद,सरफराज खान,मामा राउत,अजय नासरे,बबनराव दुरुगकर,अनिता ठेगरे,पशात ढाकणे,अनिल पांडे,हेमत चैधारी,सुनिल पाटिल,वैभव काळे,कुंदा हरडे,किशोर दहीवले,हरविंदरसिंर लोहिया,रतिका डफ,अतीक कुरेशी,पविण गवरे,अक्षय समर्थ,पिंकु काबळे,अनिल बारापात्रे,अमित खंगार,प्रफुल्ल भाजे सहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement