Published On : Mon, Sep 9th, 2019

हस्तांतरीत झालेल्या तीन विभागात महावितरणचे काम सुरु

Advertisement

नागपूर :नागपूर शहरातील वितरण फ्रेंचाइझीचे महावितरणकडे सोमवारच्या मध्यरात्री हस्तांतरण झाल्यानंतर या महाल, गांधीबाग आणि सिव्हिल लाईन्स विभागातील वीज वितरणाचा संपुर्ण ताबा महावितरणने घेतला आहे. सोमवारच्या शुन्य तासाला महापारेषणच्या मानकापूर, उप्पलवाडी, बेसा आणि पारडी या चार उपकेंद्रांसह आठ 33 केव्ही आणि 11 केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रातील एकून 87 वीजवाहिन्यांवरील इनपूट मीटरसह एका क्रॉस ओवर फ़ीडरच्या मीटरवरील नोंदी घेण्यात आल्या. याशिवाय महावितरण़ने निर्देशित केलेल्या अभियंते आणि कर्मचा-यांनी संबंधित कार्यालयाचा पदभार स्विकारला. यामुळे वितरण फ़्रॅन्चाईझीकदून हस्तांतरीत झालेल्या तीनही विभागातील महावितरणचे कामकाज आजपासून सुरळीतपणे सुरु झाले.

तद्नंतर महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू, नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, शहर मंडलचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी तांत्रीक, माहिती तंत्रज्ञान तसेच लेखा व वित्त विभागाच्या अधिका-यांसमवेत मानकापूर, काटोल रोड, सेमिनरी हिल्स, छाप्रू नगर, तुळशीबागसह इतरही भागातील वीज वितरणच्या शाखा कार्यालये, बिल भरणा केंद्र, ग्राहक सुविधा केंद्र, नियंत्रन कक्ष, उपकेंद्र आणि नवीन वीज जोडणी केंद्राला भेट देत तेथील अधिकारी व कर्मचा-यांशी चर्चा केली. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेत यात काही सुधारणा आवश्यक वाटल्यास त्याबाबत सुचना करण्याचे निर्देश दिनेशचंद्र साबू यांनी यावेळी दिले.

Gold Rate
Wednesday 07 Jan. 2025
Gold 24 KT 77,400 /-
Gold 22 KT 72,400 /-
Silver / Kg 89,900 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोबतच ग्राहकांनी नोंदविलेल्या तक्रारीचाही आढावा घेतला. ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार विजपुरवठा मिळावा यासाठी एकजूटीने सर्वांनी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. वितरण रोहीत्रांवर शेड तयार करा, सेमिनरी हिल्स येथील उपकेंद्रात जीआयएस तंत्रज्ञानाचा अवलंब करा, पैसे भरून प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या देण्यासाठी लागणा-या पायाभुत सुविधांचा प्रस्ताव सादर करा शिवाय ग्राहक सेवेसाठी सर्वोत्तम पद्धतीचा स्विकार करा, कार्यालये आणि बिल भरणा केंद्रात येणा-या ग्राहकासाठी पाण्याची व बसण्याची व्यवस्था करण्याच्या सुचनाही संचालक (संचलन) यांनी यावेळी उपस्थितांना केल्या.

यावेळी दिनेशचंद्र साबू यांनी तेथे उपस्थित असलेल्या ग्राहकांसोबतही चर्चा करीत त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या, दरम्यान वितरण फ्रेंचाइझी भागातील विद्युत वितरण प्रणालीच्या देखभालीकरीता महावितरणने एकुण 105 तांत्रिक कर्मचारी (35 विज वितरण केंद्राकरीता प्रत्येक पाळी करीता एक तांत्रिक कर्मचारी असे एकुण 105 तांत्रिक कर्मचारी) व 40 यंत्रचालकांची उपकेंद्र संचालनाकरीता प्रतिनियुक्ती केली आहे. याशिवाय फ्रेंचाइझी भागातील कार्यभार सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने मंडळं कार्यालयात विशेष नियंत्रण कक्षाची (मोबाईल क्रमांक 7875760070) स्थापणा करण्यात आलेली आहे, त्याकरीता प्रत्येक पाळीत सहाय्यक अभियंता नियुक्त करण्यात आला आहे. याशिवाय महावितरणच्या 18002333435, 18001023435 किंवा 1912 या निःशुल्क क्रमांकासोबतच महावितरण मोबाईल ॲपवरुनही ग्राहकांना तक्रारी नोंदविता येणार असल्याने ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Advertisement