— चीनमध्ये ४२५ जणांचा मृत्यू
— १७ हजार नागरिकांना व्हायरसचा विळखा
कोरोनाचा व्हायरस नेमका काय आहे?
चीनमध्ये आढळलेला कोरोना व्हायरस आज झपाट्याने इतर देशात पसरत चालला आहे. चीनमध्ये सुमारे १७ हजारपेक्षा जास्त लोकांना या व्हायरसचे संक्रमण झाले असून आतापर्यंत ४२५ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरानाचा वाढता धोका लक्षात घेता भारतासह इतर देशांनीही त्यांच्या राष्ट्रातील नागरिकांना चीनमध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे. किंबहुना चीनमध्ये जाणाऱ्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोरोना व्हायरचा प्रसार लक्षात घेता आंतरराष्ट्रीय आणिबाणीची घोषणा केली आहे. या व्हायरसमुळे सर्वाधिक लोकांचे मृत्यू हुबेई प्रांतात झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, भारतातही या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. वुहान येथून केरळमध्ये परतलेल्या एका विद्यार्थ्यांना या व्हायरची लागण झाल्याचे निष्पन्न तेथील डॉक्टरांनी काढले आहे. तो वुहान येथील विद्यापीठात शिक्षण घेत होता. यासह बिहार राज्यातही या व्हायरसचा रुग्ण आढळला आहे. मुंबई आणि देशातील इतर शहरातही कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. यावर प्रभावी लस शोधण्याचा प्रयत्न जागतिक स्तरावर केला जात आहे. चीनच्या शासनाने दक्षता म्हणून वुहान शहरात प्रवेश पूर्णपणे बंद केला आहे.
भारत शासनाने भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी वुहानमध्ये हॉटलाईन स्थापित केली आहे. केंद्र शासनातर्फे जाहीर आकडेवारीनुसार वुहानमध्ये ७०० भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. या सर्वांना भारतात परत आणण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. मागील वर्षी ‘एसएआरएस (सार्स) व्हायरसमुळे’ ८०० लोकांचा मृत्यू झाला होता. दक्षतेचे पाऊल म्हणून भारतासह जगभरातील विमान तळांवर चीनमधून येणाऱ्या विमान प्रवाशांची तेथेच आरोग्य तपासणी केली जात आहे. यासाठी विमानतळावर खास थर्मल स्कॅनर लावण्यात आले आहेत.
कोरोनाचा व्हायरस नेमका काय आहे?
— कोरोना हा सार्स व्हायरस परिवाराचा सदस्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (सार्स) खाद्य स्वरूपात वापरल्या जाणाऱ्या समुद्री प्राणी आणि जीवजंतूमधून हा व्हायरस पसरला आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर पहिल्यांदा श्वास घेण्यात त्रास होतो. गळ्यात दुखणे, सर्दी-खोकला, तीव्र ताप येणे ही लक्षणे आढळतात. यानंतर ताप निमोनिया आजारात परिवर्तित होतो. याचा थेट प्रभाव किडनीवर पडतो. यामुळे रुग्णाची प्रकृती ढासळत जाते. कोरोना व्हायरसचे वैशिष्ट्य म्हणजे तो, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला याची लागण होते. सध्यातरी यावर कोणतीही प्रभावी औषधी उपलब्ध नाही.
कोरोनाची लागण टाळण्यासाठी समुद्री माशे किंवा रानटी पशूंचे मांस खाणे टाळण्याचा सल्ला आरोग्य संघटनेने दिला आहे. बाहेरून आल्यावर अथवा काहीही खाण्याच्या अगोदर हात धुणे फायदेशीर ठरेल. शिंकताना किंवा खोकलताना रुमालाचा वापर करावा. मांस , माशे, समुद्री जीवांचे मांस आणि अंड्यांचे सेवन टाळावे. रानटी प्राण्यांच्या संपर्कात येऊ नये.
चीनी अर्थव्यवस्थेला हादरा बसणार
— कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे चीनमधील पर्यटन व्यवसायाला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. आर्थिक मंदीच्या झळा सोसणाऱ्या चीनसाठी ही धोक्याची घंटा आहे. रशियाने चीनला लागून असलेली पूर्व सीमा बंद केली आहे. जगात चीनविरोधी वातावरण निर्माण होत आहे. इतर देशात चीनी नागरिकांना वाळीत टाकल्यासारखा व्यवहार केला जात आहे. इंडोनेशियाच्या एका हॉटेल व्यवस्थापनाने चीनी पर्यटकांना तातडीने हॉटेल सोडण्यास सांगितले आहे. सियोल येथील एका रेस्टॉरेंटने चीनी नागरिकांना प्रवेश दिला जाणार नसल्याची पाटी लावली आहे.
दक्षिण कोरिया, जापान, हॉन्ग कॉन्ग आणि व्हियतनाम येथील रेस्टॉरेंट मालकांनी चीनी नागरिकांना प्रवेश देण्यास मनाई केली. हॉन्ग कॉन्गमधील रेस्टॉरेंट मालकांनी चीनी पर्यटकांना जेवण देण्यास मनाई केली आहे. फ्रान्समध्येही चीनी नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारतात काही व्यापारी संघटनांनी चीनी सामानांना स्पर्श न करण्याचे धोरण अवलंबिले. यामुळे चीनवरून आयात वस्तूंची विक्री मंदावली आहे.