नागपूर : कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे कुटुंब हैदराबादला फिरायला गेले असता त्यांच्या घरी चोरीची घटना घडली. चोरट्यांनी व्यक्तीच्या घरातील रोख आणि सोन्याचे दागीेने असा एकूण १.२५ लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना २९ नोव्हेंबरला सायंकाळी ५.२५ ते ३० नोव्हेंबरला सकाळी ११.३० दरम्यान घडली.
अमोल देवराव बनकर (वय ४१, रा. शिवगौरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ओमनगर) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह हैदराबाद येथे मुलीकडे गेले होते. आरोपी त्यांच्या घराच्या कंपाऊंडमधून आत शिरला. चोरट्याने बेडरुमच्या खिडकीचा लोखंडी कुलूप तोडले.
त्यानंतर घरातील सोन्या-चांदीचे दागीने व रोख ८० हजार असा एकुण १.२५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी बनकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.