कन्हान : – पासुन पश्चिमेस ३ कि.मी अंतरावर असले ल्या पिपरी शेत शिवारातील पवन ईखार यांच्या शेत घराच्या दाराचे कुलुप तोडुन आत ठेवलेले रोटावेटरचे दोन सेट व मशीनचे ४ फास अशा एकुण साठ हजार रूपयाच्या शेती साहित्याची अज्ञात चोराने चोरी केल्या ने शेतकरी पवन ईखार च्या तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवार (दि.११) ऑक्टोंबर ला दुपारी १ ते ३ वाजता दरम्यान पिपरी शेत शिवारात पवन रामचंद्रजी ईखार वय ३२ वर्ष राह. गाडेघाट यांचे शेत असुन त्या च्या शेतातील घराच्या दाराचे कोणीतरी अज्ञात इसमा ने कुलुप तोडुन आत प्रवेश करून खोलीत ठेवलेले रोटावेटरचे दोन सेट अंदाजे किंमत ५०,००० रूपये व रोटावेटर मशीन ला लागणारे फास ४ नग अंदाजे किंम त १०,००० रूपये अशा एकुण ६०,००० ( साठ हजार ) रूपयाच्या शेती साहित्यांची चोरी करून नेल्याने फिर्यादी पवन ईखार यांचे तोंडी तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरूध्द अप क्र. ३७८/२० २१ कलम ४६१, ३८० भादंवी अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन कन्हान पोलीस निरिक्षक संजय काळे यांच्या मार्गदर्शनात पोहवा गणेश पाल पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे.