मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीच्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटला आहे. यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरक्षणाच्या मगणीवरून गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर आरोप करत त्यांनी आरक्षण थांबिल्याचे म्हटले. यावर जर मी आरक्षण थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेईल,असे फडणवीस म्हणाले आहेत.
जरांगे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणं सर्व मंत्री काम करत असतात.
मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील त्याला तर माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ असतंच. त्यामुळं याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच हा प्रश्न विचारावा. जर त्यांनी सांगितले की, मराठा आरक्षणासाठी मी कुठलाही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न फडणवीसांनी थांबवला. तर त्याचक्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेईल,असे फडणवीस म्हणाले. राजकीय वर्तुळात फडणवीस यांच्या या विधानाची चर्चा सुरू आहे.