नागपूर : महाराष्ट्रात किती साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती केली हा डेटाच साखर आयुक्तालयाकडे नसल्याची माहिती फोरम ऑफ इंटलेक्च्युअल्सचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी दिली. देशमुख यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत यासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
कारखान्यांनी शेतकऱ्यांना किती टक्के एफआरपी दिली हेच फक्त महत्त्वाचे नाही तर इथेनॉल निर्मिती केलेल्या कारखान्यांनी जयकारा शुगर मिल्स जाहीर उतारा सॉफ्टवेअर प्रोग्रामद्वारे वसंतदादा शुगर ४.७९७% इथेनॉलमुळे उताऱ्यातील वाढ ५.३८४%, इन्स्टिट्यूटला माहिती देऊन सुधारित अंतिम जाहीर उतारा १०.१८% एफआरपी प्रमाणपत्र घेतले का? हे पण महत्वाचे आहे. २०२२-२३ गाळप हंगामासाठी १२१. कारखान्यांनी व्हीएसआयकडून सुधारित एफआरपी प्रमाणपत्रे घेतली.
पण बाकीच्यांचे काय? असा सवाल माहितीचा अधिकार कार्यकर्ते देशमुख यांनी केला आहे.
राज्यात ६ नोव्हेंबर २००२ म्हणजे तब्बल २९ वर्षांपासून नवीन सहकारी साखर कारखाना काढण्यासाठी परवानगी नाही. ते बँकेत खाते पण उघडू शकत नाहीत. तसेच नोंदणीही करू शकत नाही. आतापर्यंत १८८ सहकारी कारखान्यांपैकी सध्या फक्त १०१ कारखानेच सुरू आहेत.बाकीचे ८७ सहकारी कारखाने हे दिवाळखोरीत निघाले.
या संकटामुळे या कारखान्यांशी संबंधित असंख्य शेतकऱ्यांचे मालकी हक्क आणि शेअर्सबाबत चिंता निर्माण झाली आहे.देशमुख यांनी उपस्थित केलेले प्रश्न साखर उद्योगात विशेषत: इथेनॉल उत्पादन, एफआरपी गणना आणि या कारखान्यांच्या कामकाजाशी ज्यांची उपजीविका गुंतलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या कल्याणासंदर्भात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्याच्या गरजेवर भर देतात.