Published On : Mon, Dec 24th, 2018

देखभाल व दुरुस्ती आणि मेट्रोच्या कामांमुळे काही भागात बुधवारी वीज नाही

Advertisement

Mahavitaran logo

नागपूर: महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले देखभाल व दुरुस्तीचे कार्य सोबतच पॉलीकॅब आणि नागपूर मेट्रोच्या आवश्यक कामांसाठी बुधवार दि. 26 डिसेंबर रोजी रामदासपेठ, धंतोली, कॉग्रेसनगर, अजनी, त्रिमुर्तीनगर, रामनगर, नरसाळा आणि इतर भागातील वीजपुरवठा एक ते चार तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे.

सकाळी 8 ते 9 या वेळेत सीटीओ कंपाऊंड, बीएसएनएल, शासकीय मुद्रणालय, सकाळी 8 ते 11 या वेळेत इंदिरा अपार्टमेंट, सुभान एनक्लेव, रहाटे कॉलनी, फोरेंसिक लॅबोरेटरी, अवंती हार्ट हॉस्पिटल, शतायु हॉस्पिटल, एलआयसी कॉलोनी, धंतोलीचा भाग, विघ्नहर्ता अपार्टमेंट, टिकेकर रोड, कॉंग्रेस नगर, कालीमाता मंदिर, उज्ज्वल फ्लॅट्स, सेंट्रल बाजार रोड, रामदासपेठचा काही भाग, सकाळी 9 ते 12 या वेळेत जेल प्रेस, जेल क्वार्टर, चुना भट्टीचा भाग, वैनगंगा कॉलनी, हम्पर्याड रोडचा भाग, अजनी चौक, माऊंट कार्मेल हायस्कूल, प्रशांतनगर, समर्थनगर, रोहेरा आर्केड आणि जवळील क्षेत्र, श्याम पॅलेस, मेडिकल कॉलनी, प्रियंका अपार्टमेंट, हम्पर्याड रोडचा भाग, अजनी रेल्वे स्टेशन, होटल ग्रीन सिटी, शिवाजी सायन्स कॉलेज, हयात एन्क्लेव्ह, ऑल इंडिया रिपोर्टर, काँग्रेस नगरचा भाग, नीलगंगा अपार्टमेंट, धोंतोलीचा भाग, पंचशील चौक, लोकमत चौक, राजकमल कॉम्प्लेक्स, मेहाडीया कॉम्प्लेक्स, संघनगर, शारदानगर, कबीरनगर, जयताळा, रमाबाई अंबेडकर सोसायटी, जनहित सोसायटी, प्रज्ञा लेआऊट, दाते लेआऊट, भेंडे लेआऊट, पन्नासे लेआऊट, मनीष लेआऊट, पाटील लेआऊट, स्वागत सोसायटी, इंद्रप्रस्थनगर, सीजीएच सोसायटी, जयबाद्रीनाथ, सकाळी 10 ते 12 या वेळेत मालवीय नगर, पांडे लेआऊटचा भाग, योगेक्षम लेआऊट, खामला चौक, नवीन स्नेह नगर, सकाळी 10 ते 1 या वेळेत रामनगर, बाजीप्रभुनगर, हिलटॉप, मुंजबाबा आश्रम, वर्मा लेआऊट, सुदामनागरी, उज्जवल सोसायटी, पांढराबोडी, संजयनगर, शिवाजीनगर, हिल रोड, सीमेंट रोड, शिवाजीनगर बागेजवळ, धरमपेठ, भगवाघर, व्हीआयपी रोड, गोकुलपेठ, बास्केटबॉल ग्राउंड, धरमपेट एक्सटेंशन, सेंट्रल मॉल, सकाळी 10 ते दुपारी 2 या हिंदुस्तान कॉलनी, मारारटोली, तेलंगखेडी, अमरावती रोड, गोंड वस्ती, रामनगरचा भाग, शास्त्री लेआऊट, अग्ने लेआऊट, जुना खामला, सिंधी कॉलनी, टेलीकॉमनगर, प्रतापनगर, रिंग रोड, सावरकर चौक, सेंट्रल एक्साइज कॉलनी, वेंकटेशनगरचा भाग, ताजेश्वरनगर, चंदनशेशनगर, कृष्णम नगरी, नरसाळा या भागातील वीजपुरवठा बंद राहणार असून ग्राहकांना होणा-या त्रासाकरिता महावितरण दिलगिर आहे. वीजपुरवठा बंद राहणा-या ग्राहकांना महावितरणतफ़े मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून पुर्वसुचनाही देण्यात आली असून ग्राहकांनी यावेळी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Gold Rate
05 April 2025
Gold 24 KT 89,100/-
Gold 22 KT 82,900/-
Silver / Kg - 88,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement