नागपूर : भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या ओवाळणीत टाकल्या पैसे नाही म्हणून बेरोजगार भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जरीपटका परिसरात घडली. पैसे नसल्यामुळे नैराश्यातून राहूल सोमकुवर (२९, मिसाळ ले आऊट, जरीपटका) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
माहितीनुसार, राहूल सोमकुवर हा बेरोजगार होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो काम शोधत होता. मात्र त्याला कामच भेटत नव्हते. विवाहित असलेली बहीण दिवाळी आणि भाऊबीजेसाठी माहेरी आली. तिने भावाची ओवाळणी केली. ‘तुझ्या ओवाळणीच्या ताटात टाकयला माझ्या खिशात पैसे नाहीत. मला माफ कर’ असे म्हणत त्याच्या डोळ्यात अश्रू आले. बहिणीने त्याची समजूत घातली.
मात्र नैराश्यातून मध्यरात्रीच्या सुमारास त्याने घराच्या छतावर गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी उपनिरीक्षक संस्कृतायन यांनी सूचनेवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.