Published On : Fri, Apr 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मराठी भाषेसोबतच पाटीवर इतर नाव असण्याला काहीच हरकत नाही;उर्दू नाव हटविण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रातील प्रत्येक फलकावर मराठी भाषेच्या पाठ्य बंधनकारक असल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यापार्श्वभूमीवर फलकावर स्थानिक प्राधिकरणाचे नाव लिहिण्यासाठी मराठी भाषेचा उपयोग करणे अनिवार्य आहे पण, अतिरिक्त म्हणून उर्दू वा इतर भाषेचाही उपयोग केला जाऊ शकतो. याकरिता संबंधित कायदा प्रतिबंध करीत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांनी हा निर्णय दिला.

अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या इमारतीला लावलेल्या फलकावर मराठी व उर्दूमध्ये नगरपरिषदेचे नाव लिहिण्यात आले आहे. त्यापैकी उर्दूमधील नाव हटविण्यासाठी वर्षा बागडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे (कार्यालयीन भाषा) कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरणांमध्ये केवळ मराठी भाषेचाच उपयोग करणे बंधनकारक आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

याशिवाय वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगरपरिषदेचे नाव मराठीसह उर्दूमध्येही लिहिण्याचा ठराव रद्द करणाऱ्या निर्णयाला सलीमोद्दीन शमशोद्दीन व इतरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या दोन्ही प्रकरणांवर एकत्र सुनावणी करून उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

Advertisement