मुंबई : विधानसभा निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मानधनात वाढ करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. गेल्या काही महिन्यांपासून २१०० रुपये कधी वाढणार याची चर्चा होती. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा केली जाईल, असे सांगण्यात येत होते.मात्र आज जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विचारण्यात आले.
कोणत्या योजना तयार झाल्यानंतर त्याबाबत आर्थिक तरतूद केली जाते. आपल्याला योजनेसाठी पैसे किती लागणार आहे, ते वर्षभराने समजते. मागच्या वर्षीच्या अंदाजाच्या आधारावर आम्ही पैसे ठेवलेले आहेत.उद्या योजनेचे पैसे वाढवायची गरज पडली, तर वाढवता येतात. कुठलीही अडचण नाहीत . आवश्यक तेवढी तरतूद याच्यामध्ये ठेवण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शेवटी अर्थसंकल्पाचे संतुलन ठेवणे हे देखील महत्त्वाचं आहे आणि घोषणा पण आपली पूर्ण करायची आहे.आता ट्रेण्ड आमच्याकडे चांगले आहेत. राष्ट्रीय स्तरावर ७ टक्क्यांवर आहे. पण, त्याचवेळी जर आपल्याला शाश्वत पद्धतीने आपल्या योजना चालवायच्या असतील, तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवावी लागेल.
\एप्रिल महिन्यामध्ये २१०० रुपये मिळणार नाही. एप्रिल महिन्यामध्ये १५०० रुपयेच मिळतील. ज्यावेळी आम्ही सुरू करू. घोषित करू. आम्ही लपवून थोडी घोषित करणार आहोत? आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून २१०० रुपये आणि त्या महिन्यापासून देऊ, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.