Published On : Thu, Sep 28th, 2023
By Nagpur Today Nagpur News

भाजपमध्ये नाही तर काँग्रेसमध्येच स्फोट होणार; चंद्रशेखर बावनकुळेंचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करत लवकरच पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला होता. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले.

नाना पटोले यांना भाजप समजली नाही त्यामुळे भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये गेले. भाजप हा व्यक्तीसाठी आणि परिवारासाठी काम करत नाही त्यामुळे कधीच पक्षात स्फोट होऊ शकत नाही. उलट काँग्रेसमध्ये एकमेकाचे पाय ओढण्याचे काम सुरू असल्यामुळे त्यांच्या पक्षात स्फोट होण्याची जास्त शक्यता अधिक आहे, असे बावनकुळे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.

Gold Rate
Monday 03 Feb. 2025
Gold 24 KT 82,400 /-
Gold 22 KT 76,600 /-
Silver / Kg 93,300 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भाजपपेक्षा काँग्रेसमध्ये येणाऱ्या काळात मोठे स्फोट होण्याचे जास्त शक्यता आहे. काँग्रेसच्या काळात आतंकवादी भारतात घुसत होते, कसाबकडून दहशतवादाची पेरणी कॉंग्रेच्या काळात झाली होती. भाजपने पाकिस्तानच्या घरात घुसून मारण्याची ताकद दाखवली.

या विषयावर नाना पटोले यांच्यासोबत चर्चा करायला कुठल्या चौकात तयार आहे.गेल्या ६५ वर्षात काँग्रेसने कसा आतंकवाद पसरवला हे सांगतो असे बावनकुळे म्हणाले. तसेच आरक्षणाच्या बाबतीत सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

Advertisement