नागपूर: नद्या आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे ही प्रत्येक नागरिकची जबाबदारी आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे नदी स्वच्छता अभियान हाती घेऊन एक लोकोपयोगी कार्य सुरु केले आहे. पावसाळ्यापूर्वी पिवळी, नाग व पोहरा नदी पात्रामधील कचरा, गाळ हटविल्यास पावसाळ्यात पाण्याचा निचरा होईल. नागरिकांनी वैयक्तीक, सामाजिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने आदींनी अभिय़ानात सहभाग घेऊन नद्या स्वच्छ करण्यात सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे पिवळी, नाग व पोरा नदीच्या स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जरीपटका येथील नारा घाटा जवळ ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे व महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते पिवळी नदीच्या स्वच्छता अभियानाला सोमवारी (ता. 17 एप्रिल 2017) रोजी सकाळी सुरुवात झाली. पावसाळ्यापूर्वी या तीनही नद्या व शहरातील नाले स्वच्छ करण्याची मोहीम नागपूर महानगरपालिकेने हाती घेतली आहे. या अभियानात त्या त्या भागातील नागरिकांच्या सहकार्याने हे नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. पिवळी नदीचे स्वच्छता अभियान नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.
यावेळी प्रामुख्याने महापौर नंदा जिचकार, पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दिपराज पार्डीकर, स्थाई समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नागपूर सुधार प्रन्यास सभापती डॉ. दिपक म्हैसेकर, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, माजी महापौर प्रवीण दटके, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, आसीनगर झोन सभापती भाग्यश्री कानतोडे, सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, बसपा गटनेता मो. जमाल, ज्येष्ठ नगरसेवक विरेंद्र कुकरेजा, मनोज सांगोळे, मुरलीधर मानवटकर, मो. इब्राहिम टेलर, जितेंद्र घोडेस्वार, स्नेहा निकोसे, नसरिम बानो, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, संगिता गि-हे, अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, डॉ. आर.झेड. सिद्दीकी, नागपूर सुधार प्रन्यासचे अधिक्षक अभियंता सतिश पासेबंद, ना.सु.प्र चे कार्यकारी अभियंता मनोज इटकेलवार, मनपाचे अधिक्षक अभियंता दिलीप जामगडे व मनोज तालेवार, आसीनगर झोनचे सहा.आयुक्त विजय हुमणे, मंगळवारी झोनचे सहा. आयुक्त हरिष राऊत, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप दासरवार, नदी व सरोवर प्रकल्पाचे मो. इजराईल, डॉ. विंकी रुघवाणी, घनश्याम कुकरेजा, भोजराज डुंबे यांच्या सह संबंधीत विभागाच्या अधिकारी व आरोग्य झोन अधिकारी यांची उपस्थिती होती.
संगम चाळ येथे नागनदी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या सर्व कार्यक्रमांना महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक विक्की कुकरेजा, अति. आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, धरमपेठ झोन सभापती श्रीमती रुपा राय, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, सुनील हिरणवार, नगरसेविका उज्वला शर्मा, दिव्या घुरडे, धरमपेठ झोनचे सहा. आयुक्त महेश मोरोणे, धंतोली झोनचे सहा. आय़ुक्त गणेश राठोड यांची उपस्थिती होती.
सहकारनगर घाटाजवळील पोहरा नदी स्वच्छता अभियान कार्यक्रमाला आ. सुधाकर देशमुख, महापौर श्रीमती नंदा जिचकार, उपमहापौर दिपराज पार्डीकर, स्थाई समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्षनेता संदीप जोशी, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी महापौर प्रविण दटके, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, विधी समिती सभापती मीनाक्षी तेलगोटे, महिला बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, अपर आय़ुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, लक्ष्मीनगर झोनच्या सहा. आय़ुक्त सुवर्णा दखणे,आरोग्य अधिकारी डॉ. प्रदिप दासरवार यांच्यासह मनपाचे सर्व विभाग प्रमुख व आरोग्य विभागाचे झोन अधिकारी व संबंधीत सर्व अधिकारी उपस्थित होते.