नागपूर : छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यातील भेटीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यांना प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ कोणातच चुकीचा निर्णय घेणार नाहीत. ते आज शरद पवार यांच्याशी भेटले.
दोन्ही नेत्यांच्या भेटीत विकासाच्या किंवा सामाजिक विषयावर चर्चा असल्याचे बावनकुळे म्हणाले. भुजबळ साहेबांची ही राजकीय भेट होणार नाही. छगन भुजबळजी असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याचा महायुतीवर नकारात्मक परिणाम होईल.
दरम्यान महायुती सरकारमध्ये फूट पाडण्याचे कारण नाही. विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे सर्व पक्ष एकत्र राहिले. भविष्यातही महायुती एकसंघ म्हणून निवडणूक लढवेल आणि सत्तेत येईल, असा दावा बावनकुळे यांनी केला.