नागपूर : शहरात ठिकठिकाणी चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मोबाईलचे एक दुकान फोडून जवळपास सव्वा दोन लाख किंमतीचे मोबाईल लंपास केले. ही घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
माहितीनुसार, नरेश प्राणनाथ घई (५२, पार्क व्हु अपार्टमेंट,कस्तुरचंद पार्क) असे दुकानदाराचे नाव असून त्यांचे टेलिफोन एक्स्चेंज चौक येथे काव्या मोबाईल शॉप आहे. शनिवारी रात्री त्यांनी दुकान बंद केले व सोमवारी दुकान उघडले.
यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी शटर्सचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दुकानातील विविध कंपन्यांचे २१ मोबाईल व तीन स्मार्ट वॉच असा एकूण २.३५ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. घई यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.