मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. यातच माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे पूत्र तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू आहे. आता पुन्हा तेजस यांच्या राजकीय प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
तेजस ठाकरे यांचा आज २७ वा वाढदिवस आहे. यानिमत्त मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही तेजस ठाकरे यांना शुभेच्छा देणारे ट्वीट केले आहे. तसेच हे ट्वीट करताना त्यांनी तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत संकेत दिले आहे.
पेडणेकर ट्विटमध्ये म्हणाल्या की, निसर्गप्रेमी, वाइल्डलाईफ फोटोग्राफर, जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतलेले सुप्रसिद्ध अभ्यासू वन्यजीव संशोधक तेजस उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! ही तोफ लवकरच धडाडणार, विरोधकांसह गद्दारांच्या छातीत धडकी भरवणार, असे ट्विट पेडणेकर यांनी केल्याने तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहेत.