नागपूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात दंगल उसळण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच प्रतिमा ढासाळयाचा प्रयत्न विरोधी पक्षनेत्यांकडून केला जात आहे.
सोमवारी नागपुरात माध्यमांशी बोलत असताना बावनकुळे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. शरद पवार निवडणुकीपूर्वी दंगली घडवण्याबाबत बोलत आहेत. हे योग्य नाही. पण जनता शहाणी आहे. महाराष्ट्रातील जनता दंगली करेल, अशी परिस्थिती कधीच नव्हती आणि कधीच होणार नाही.
ज्यात विविध प्रकारची आंदोलने करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना रोखण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. शरद पवारांनी दंगल भडकवणारी भाषा का वापरली? त्याच्या मनात काय आहे ते मला माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांना खलनायक बनवले जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फडणवीस यांची भूमिका प्रामाणिक असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेसचे नेते फिरकले नाहीत. काँग्रेस या मुद्दय़ावर राजकारण करत आहे. समाजात तेढ निर्माण करून याला काँग्रेस जबाबदार असल्याचे बावनकुळे म्हणाले.