नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पीएम मोदींच्या हस्ते करण्यात आली आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण होते. यावर पहिल्यांदाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.
रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा हा केवळ भाजपचा राजकीय कार्यक्रम होता.
अयोध्येतील राम मंदिराच्या सोहळ्याबाबत त्यांनी हे विधान केले. देशभरात तयार झालेल्या या लाटेचा सामना कसा करणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.देशात कोणती लाट आहे असे नाही. मी याआधीही म्हटले होते की हा भाजपचा राजकीय कार्यक्रम आहे. नरेंद्र मोदींनी तिथे जो कार्यक्रम केला तो चांगला आहे. मात्र अशी कोणतीही लाट सध्या देशात नाही असेही राहुल गांधी म्हणाले.देश मजबूत करण्यासाठी न्यायचे पाच स्तंभ आहेत आणि ते पुरेसे आहेत असे मला वाटते असेही राहुल गांधी म्हणाले.
देशात प्रचंड बेरोजगारी आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे, प्रचंड महागाई आहे, शेतकरी संघर्ष करत आहेत आणि या राज्यात एकाही तरुणाला नोकरी मिळत नाही. हेच मुद्दे आम्ही भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मांडत असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.