बारामती: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
ही योजना म्हणजे निवडणुकीसाठी जुमला आहे. आता दोन, तीन महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. परंतु या योजनेचा त्यात काही फायदा होणार नाही. ही योजना चांगली आहे, मात्र त्यात अटी शर्थी टाकल्या आहेत. त्यामुळे खरेच योजना किती महत्वाची आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे.
या योजनेमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, ही अपेक्षा आहे. या योजनेचे स्वागत केले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
लाडकी बहीण योजना ही मध्यप्रदेशच्या धरतीवर सुरू झाली. त्याठिकाणी भाजपला चांगला फायदा झाला. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी शिवराज सिंह चौहान यांचे कौतुक केले.