Published On : Sat, Jun 29th, 2024

राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘खोटं नरेटिव्ह’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Advertisement

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीआधीचा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे महायुती सरकारने घोषणांचा पाऊस पाडला.

राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘खोटं नरेटिव्ह’ असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

Advertisement

गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मागची 10 वर्ष भाजपच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून महाराष्ट्राने त्यांना जो काही दणका दिला, त्यानंतर यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेसे वाटत आहेत. तरीदेखील जनता यांच्या थापांवर विश्वास ठेवेल असे वाटत नाही.

महाराष्ट्राची जनता सुजाण, सज्ञान आणि स्वाभीमानी आहे. यांनी कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्राचं ओरबाडून गुजरातला न्यायचं षडयंत्र उघड झालं आहे. महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला आहे’, अशी टीका उद्धव ठाकरेंनी या अर्थसंकल्पावर केली आहे.