Advertisement
नागपूर: मौजा सक्करदरा येथील खसरा क्रमांक २६, २७ मधील नागपूर सुधार प्रन्यासच्या प्लॉट नं. १३६ वरील अतिक्रमण काढण्यात आले. नागपूर सुधार प्रन्यासतर्फे आज गुरवार, दिनांक २५ एप्रिल रोजी सदर कारवाई करण्यात आली. अधीक्षक अभियंता (मुख्यालय) यांच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईत नासुप्र’च्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. संजय चिमुरकर, विभागीय अधिकारी श्री. अनिल राठोड, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्री संदीप राऊत, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्री. राकेश पौलझगडे आणि क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील उपस्थित होते.