नागपूर: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात १२ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित कॉंग्रेस पक्षाचा मोर्चा ऐतिहासिक करण्याचा एकमुखी निर्धार नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस केमेटीच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केला.
नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष आणि माजी मंत्री श्री.राजेंद्र मूळक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीला विधान सभेचे उपनेते आ. विजय वडेट्टीवार,आ.सुनील केदार,नाना गावंडे,माजी आमदार एस.क्यू जामा,रविंद्र दरेकर,संजय मेश्राम,कुंदाताई राउत,हुकुमचंद आमदरे,चंद्रपाल चौकसे,रमेश जोध,सुरेश कुमरे,साजाभाई,राजा तिड़के,वसंतराव गाडगे,काशीनाथ प्रधान,आदिसंह जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधून आलेले प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्तिथ होते.
या आढावा बैठकीत राजेंद्र मूळक यांनी नागपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील सर्व तालुका अध्यक्ष,जि.प आणि न.प. सदस्य,महिला कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्या यांचेशी मतदार संघ निहाय चर्चा केली. भारतीय जनता पक्षाच्या ऐकूण कारभारा बाबतच समाजातील सर्व स्तरातील नागरिकामध्ये जो प्रचंड असंतोष पेटला आहे त्याची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.
१२ डिसेंबरच्या मोर्चात संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात उपस्तिती राहणार असली तरी हा मोर्चा ऐतिहासिक करण्याची जबाबदारी नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्याची आहे.त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा ऐतिहासिक करावचा आहे. असे आवाहन त्यांनी करताच उपस्तिथ कार्यकर्त्यांनी त्यांच्या या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला।नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक शेतकरी या मोर्चात उपस्तिथ राहतील असेही ते यावेळी म्हणाले.
नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यामधून आलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी यावेळी भावना व्यक्त केला. आढावा बैठकीत विधानसभेचे उपनेता आ.विजय वडेट्टीवार यांनीही उपस्तिथीतांना मार्गदर्शन केले. १२ डिसेंबरचा मोर्चा ऐतिहासिक होणे कसे गरजेचे आहे हे त्यांनी उपस्तिथितांना पटवून दिले.आ.सुनील केदार,नाना गावंडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले या आढावा बैठकीला शांताताई कुमरे,नंदाताई नारनवरे,पदमाकर कडु,उपासराव भूते,मनोज तितरमारे,डॉ जोतस्ना कुमरे,राजेश यादव,दयाराम भोयर,वैशाली मानवटकर,अवंतिका लेकुरवाळे,शिल्पा जवादे,विलास कडु,चेतन देशमुख,शंकर झलके,सुभाष ढगे,आबिद ताजी,मतीन खान,मधुकर बेले,सिनु यांगंटी,रत्नाकर बरबटे,शैलेश कोपरकार,राजेश देशमुख,मोतीराम केदार,नदीम जामा,विशाल देशमुख,सूरज इटनकर,सुदर्शन नवघरे,सतीश चव्हाण,चंद्रशेखर ठवकर,सुरेश येरने,मधुकर लांजेवार इत्यादि उपस्तित होते.