नागपूर- अंबाझरी टी पॉइंटजवळ विचित्र अपघात झालाय. सकाळी 9.30 वाजता दुचाकीवर असलेल्या तीन मुलींना या क्रेननं धडक दिली आहे. क्रेनच्या धडकेत दुचाकीवरील तिघींचा मृत्यू झाला. क्रेन उलट्या दिशेनं येत असताना क्रेनच्या खाली त्या चिरडल्या गेल्या.
अपघातानंतर एकीचा मृत्यू घटनास्थळी झाला, तर दोघींना रुग्णालयात नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. तरुणी अॅक्टिव्हा दुचाकीवरून ट्रिपल सीट कॉलेजला जात होत्या. रायसोनी महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनी होत्या.
या भीषण अपघातात श्रुती बनवारी, स्नेहा अंबाडकर, रुचिका बोरीकर यांचा मृत्यू झाला आहे.