Advertisement
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनपुत्र नगर येथील पाण्याच्या टाकीजवळ तीन महिन्याची बेवारस चिमुकली जखमी अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तात्काळ अर्भकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसीएच) दाखल केले.
तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.बाळाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती आणि तिच्या शरीराच्या काही भागांवर मुंग्या चावल्या होत्या, असे डॉक्टरांनी सांगितले.
या चिमुकलीचे आई -वडील कोण आहेत याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.याबतात सुगावा गोळा करण्यासाठी ते परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात संबंधित माहिती असल्यास नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.