नागपूर : पावसाळ्याला सुरुवात झाली की, बरेच कीडे, कीटक आणि इतर जीव दिसू लागतात. घराबाहेरच नव्हे तर घरातही असे जीव दिसत असतात. यातच साप म्हटले तरी मोठ्या माणसांनाही घाम फुटतो. असा साप प्रत्यक्षात समोर दिसला की थरकाप उडतो. विचार करा कुणी गाढ झोपेत असेल आणि त्याच्या शर्टमध्ये तो साप त्याला नकळत घुसला असेल तर काय होईल? असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .
एक तरुण एका झाडाखाली शांत झोपला होता. मात्र त्याचवेळी त्याच्या शर्टमध्ये साप घुसला. हा साप कोणता साधासुधा साप नसून विषारी खतरनाक कोब्रा साप आहे. तरुणाच्या सतर्कतेने हा साप काढण्यात इतरांना यश आले आहे. व्हिडीओतील तरुण घाबरलेल्या अवस्थेत झाडाखाली कोणतीही हालचाल न करता बसला आहे. तर इतर काही जण त्याच्या शर्टातून तो साप सुखरूपरित्या काढण्यास त्याची मदत करत आहेत. अखेर तो साप आपोआपच त्या व्यक्तीच्या शर्टातून निघतो. सुदौवाने त्या व्यक्तीला सापाने चावा घेतला नाही. मात्र या घटनेमुळे तो खूप घाबरलेला असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात कुठेही विषारी कीटक, कीडे आणि असे प्राणी लपून राहतात. त्यामुळे सांभाळून राहायला हवे. पावसाळ्यात साप कोणत्याही जागी असू शकतात, त्यामुळे सावध राहा.