सखी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय संस्थेमार्फत दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंतीचा कार्यक्रम राणप्रताप नगर चौक, नागपूर येथे हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.
जयंती निमित्त संस्थेतर्फे सर्वप्रथम केक कापण्यात आला व भीमगीतांचा संगीत कार्यक्रम घेऊन १६०० ते १७०० लोकांना भोजनदान करण्यात आले.
सखी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय संस्थेच्या सचिव सौ. मनीषा भालाधरे ह्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकून शिक्षणाने आत्मविश्वास वाढून निर्माण झालेल्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणे हा मार्ग आपल्याला यशाकडे घेऊन जातो, असे विचार मांडले.
कार्यक्रमास कॉ. मोहनदास नायडू, प्रफुल् गूडधे, किशोर उमाठे, पंजू तोतवाणी, शयाम काळे, अर्चना बडोले, राकेश पन्नासे, डॉ. आशिष कडू आदी मान्यवरांनी भेट देऊन डॉ. आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे आयोजन सखी शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय संस्थेच्या उपाध्यक्ष वैशाली साखरे, सोनाली हिवरकर, नितिन नायडू, सुरेश रेवतकर, मदन पाटील यांनी केले.