Published On : Wed, Aug 14th, 2024
By Nagpur Today Nagpur News

कामठी तालुक्यातील वरंभा गावात वाघाची दहशत,दोन गायीवर चढवला हल्ला

Advertisement

Tiger attack in Varambha village of Kamthi taluka

कामठी: तालुक्यातील वरंभा गावात वाघाची दहशत पाहायला मिळत आहे. नागपूर जिल्ह्यात काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचं दर्शन होत आहे.

त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वरंभा गावात श्रावण सदाशिव मोहूर्ले यांच्या शिवारात बांधलेल्या दोन गायींवर वाघाने हल्ला करत त्यांना ठार केले.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वाघाच्या मुक्त संचारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शेकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. मजूरही शेतात जाण्यास घाबरत आहेत. परिणामी शेती कामे खोळंबली आहेत.

या वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement