Advertisement
नागपूर: जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणाऱ्या वेकोलि कामठी उपक्षेत्र आणि गोंडेगाव प्रकल्पातील कोळसा डंपिंग यार्डमध्ये एका वाघाचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. यामुळे WCL कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वेकोलि कामठी उप-क्षेत्र आणि गोंडेगाव प्रकल्पादरम्यान रात्रीच्या वेळी वाघ मुक्तपणे फिरत असतो. तर WCL कामगारांना कोळसा खाण क्षेत्रात तीन शिफ्टमध्ये कामावर जावे लागते. त्यामुळे येथील कामगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
वेकोलि कामठी उपप्रादेशिक व्यवस्थापक शरद कुमार दीक्षित यांनी रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना पत्र लिहून वाघाला लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली आहे.