Published On : Tue, Nov 5th, 2024
By Nagpur Today Nagpur News

कामठीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर यांच्यात चुरशीची लढत; इतर 19 उमेदवारही रिंगणात

Advertisement

नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या लढतीत कामठी मतदारसंघात अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. याठिकाणी मुख्य लढत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते सुरेश भोयर यांच्यात होणार आहे. यासोबतच 19 उमेदवार या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

कामठी मतदारसंघात बावनकुळे यांची पकड मजबूत –
चंद्रशेखर बावनकुळे यापूर्वी या जागेवरून आमदार राहिले आहेत. मतदारसंघात त्यांची चांगलीच पकड आहे. मतदारसंघातील लोकांशी असलेला त्यांचा संबंध आणि पालकमंत्री असताना केलेली कामे यामुळे आगामी निवडणुकीत ते विजयी होण्यासाठी प्रबळ उमेदवार बनतात.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दुसरीकडे सुरेश भोयर यांचा भाजपच्या टेकचंद सावरकर यांच्याकडून 2019 च्या चुरशीच्या स्पर्धेत 11,116 मतांनी पराभव झाला. बावनकुळे आणि भोयर यांच्यातील लढत इतर पक्षांच्या उमेदवारांच्या उपस्थितीमुळे प्रभावित होऊ शकते जसे की वंचित बहुजन आघाडीचे प्रफुल मानके, आझाद समाज पक्षाचे प्रशांत बनसोड (कांशीराम), बहुजन समाज पक्षाचे विक्रांत मेश्राम,रिपब्लिकन पक्षाचे अमोल वानखेडे आणि विजय डोंगरे भारतीय आंबेडकरी पक्ष हे देखील याठिकाणावरून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

Advertisement