Published On : Mon, Dec 23rd, 2019

नैसर्गिक विधी रोखून धरण्याची वेळ रेल्वे गार्डवर?

-मालगाडीच्या ब्रेकव्हॅनमध्ये वीज, पाणी, शौचालयच नाही,राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजराजसिग यांची माहिती, गार्डविना धावते मालगाडी

नागपूर: गार्ड्स रेल्वेचा महत्वपूर्ण घटक आहे. मात्र, प्रवासी गाड्यांच्या गार्ड्सला विशेष सुविधा आणि मालगाडीच्या गार्ड्सना आवश्यक सोयी सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहेत. मालगाडीच्या ब्रेकव्हॅनमध्ये वीज, पाणी, शौचालय आणि बसण्याची व्यवस्थाही नाही. अशा विपरीत स्थितीत गार्ड्सना काम करने शक्य होत नाही. या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी लढा सुरू असल्याची माहिती ऑल इंडिया गार्ड्स कॉन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजराजqसग यांनी दिली. दोन दिवसीय आमसभाग नागपुरात पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

लोकोपायलट हा समोर असतो. त्यामुळे मागे काय होते, याविषय त्यांना माहिती नसते. यासाठी गार्डचा डबा शेवटी असतो. याडब्याला ब्रेकव्हॅन असे म्हणतात. एक गार्ड संपूर्ण गाडीवर लक्ष ठेवून असतो. ५२ वॅगनच्या मालगाडीची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असते. ९ तास काम केल्यानंतर दुसरे काही करण्याची त्याची स्थितीच नसते. यानंतरही बरेचदा १५ ते २० तास काम करण्याची पाळी त्यांच्यावर येते. त्याचा मोबदला मिळत असला तरी सतत आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्याचे कारणही तेवढेच सबळ आहे. मालगाडीच्या ब्रेकव्हनमध्ये वीज, पाणी, शौचालय आणि बसण्याचीही व्यवस्था नाही. कर्तव्याचा भाग म्हणून ९ तासांची ड्यूटी प्रामाणिकपणे पार पाडली जाते. दिवसेंनदिवस आरोग्य ढासळत असल्याने अशा स्थितीत आणखी किती दिवस काम करायचे? असा सवाल ब्रिजराजqसग यांनी उपस्थित केला.

नैसर्गिक विधी किती वेळ राखून धरणार, पर्याय नसल्यामुळे धावत्या रेल्वेतच मोकळे व्हावे लागते. यानंतरही बरेचदा अतिरीक्त १५ ते २० तास काम करावे लागते. त्यावेळी ब्रेकव्हॅनमध्ये थांबनेच कठिण होते. अतिरीक्त काम करण्यास कर्मचाèयांनी नकार दिल्यास महिण्यातून आठवडाभर गार्डविना मालगाडी धावत असल्याची धक्कादायक बाब त्यांनी सांगितली.

ब्रेकव्हॅनचे गार्ड्स पर्यावरण आणि निसर्गा विरूध्द काम करीत असतात त्यांना विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी किमान अपेक्षा आहे. मात्र, सातव्या वेतन आयोगात गणवेश भत्ता स्टेशन मास्टरच्या तुलनेत अर्धा देण्यात आला आहे. स्टेशन मास्टर आणि गार्ड्स ही दोन्ही पदे सारखीच आहेत. विशेष म्हणजे स्टेशन मास्टर हा रेल्वे स्थानकात असतो तर गार्ड्स हा सतत धुळ आणि कोळश्यांच्या सानिध्यात असतो. तरीही स्टेशन मास्टरच्या तुलनेत गार्ड्सला ५० टक्के गणवेश भत्ता दिला जातो.

अलिकडेच रेल्वेच्या खाजगीकरणाला गती मिळाली आहे. सुरक्षा आणि संरक्षेच्या दृष्टीने हे धोक्याची घंटा आहे. त्यामुळे खाजगीकरणाला त्यांनी विरोध दर्शविला आहे. याशिवाय निवृत्ती वेतनाचाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कर्मचाèयांच्या उर्वेरीत भविष्याचा हा प्रश्न असून निवृत्ती वेतनाची योजना सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली. पत्रपरिषदेला संघटनेचे राष्ट्रीय सचिव पुरूषोत्तम qसग, अशोककुमार श्रीवास्तव, मार्गदर्शक एस. के. शुक्ला, राष्ट्रीय महासचिव एम.एन. प्रसाद, एस.पी. qसग, एम.पी. देव, सतीश यादव उपस्थित होेते.

८ जानेवारीला भारत बंद
खासगीकरण आणि केंद्राच्या योजनेच्या विरुध्द सात केंद्रिय कर्मचारी संघटनांनी ८ जानेवारीला भारत बंद पुकारले आहे. संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ऑल इंडिया गार्ड्स कॉन्सिल भारत बंदच्या आंदोलनात सहभागी होणार आहे.

Advertisement