मुंबई: मुंबईत पावसाळ्यात टायटानिक जहाजासारखी परिस्थिती निर्माण होणार असल्याचे भाकीत करीत स्वाभिमान संघटनेचे नितेश राणे यांनी मुंबई महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले आहे . ‘टायटॅनिक मुंबई व्हर्जन कमिंग सून’ अशी टॅग लाईन देत ट्विटर वर एक फोटो ट्विट केला आहे. पावसाळा ५ दिवसांवर येऊन ठेपला. नालेसफाईची ३१ मे ही तारीख गेली पण मुंबईतील नालेसफाई पूर्ण झालीच नाही. त्याच बरोबर अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती सुरूच आहे. यामुळे यावर्षी पावसाळ्यात मुंबई तुंबणार हे नक्की.
मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता याचे डायरेक्टर असतील तर असिस्टंट डायरेक्टर शिवसेनेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे असतील. यात विशेष आभार हे UT कुटुंबाचे म्हणजे ठाकरे यांचे मानले आहेत. अतिशय सूचक आणि मार्मिक असे हे ट्विट राणेंनी केले आहे. यामुळे पालिका अधिकारी किंवा सत्ताधारी शिवसेना उरलेल्या दिवसात किती काम कारून घेते हे आपल्याला दिसणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.