Published On : Wed, Jan 24th, 2024
By Nagpur Today Nagpur News

अमित स्पोर्ट्स अकादमी व युनिटी स्पोर्ट्सला जेतेपद

खासदार क्रीडा महोत्सव : योगासन स्पर्धा
Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत योगासन स्पर्धेमध्ये अमित स्पोर्ट्स अकादमी आणि युनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने जेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये योगासन स्पर्धा पार पडली.

दक्षिण नागपूरचे आमदार श्री. मोहन मते यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सतीश मोहगावकर, महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे सचिव अमित मिश्रा, नागपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या उपाध्यक्ष श्रीमती आरती अग्रवाल, सचिव अनील मोहगावकर, माजी नगरसेवक भगवान मेंढे, नबीरा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग संचालक तेजसिंह जगदळे, समन्वयक संदेश खरे, भूषण टाके, सतीश भुरले उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्पर्धेमध्ये 13 ते 15 वर्ष वयोगटामध्ये मुलींमध्ये अमित स्पोर्ट्स अकादमी संघाने तर मुलांमध्ये युनिटी स्पोर्ट्स असोसिएशनने अव्‍वल स्थान प्राप्त करीत स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले. मुलींमध्ये ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टीक प्रकारात अमित स्पोर्ट्सने तर रिदमिक प्रकारात युनिटी स्पोर्ट्सने आघाडी घेतली. मुलांच्या गटात ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टीक प्रकारात युनिटी स्पोर्ट्सने तर रिदमिकमध्ये नेहरू क्रीडा मंडळ संघाच्या खेळाडूने प्रथम स्थान प्राप्त केले.

स्पर्धेत 7 ते 9 वर्ष वयोगटात यशस्वी जीवतोडे ही सर्वाधिक कमी वयाची खेळाडू होती. तिने आर्टिस्टीक प्रकारात सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली.

स्पर्धेच्या समारोप प्रसंगी माजी नगरसेवक विजय (पिंटू) झलके, बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे कार्याध्यक्ष प्रकाश मासुरकर, भाजपा युवा मोर्चाचे महामंत्री गुड्डू गोमासे, विनोद मेश्राम उपस्थित होते.

निकाल (सुवर्ण, रौप्य, कांस्य)

13 ते 15 वर्ष वयोगट : मुली

ट्रॅडिशनल

श्रावणी राखुंडे (अमित स्पोर्ट्स अकादमी) 126.5

याशिका बारापात्रे (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 124.5

वेदांती भुते (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 122

रिदमिक

याशिका बारापात्रे (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 254

स्वर्णिका नौकरकर (अमित स्पोर्ट्स अकादमी) २०६.५

आर्टिस्टीक

श्रावणी राखुंडे (अमित स्पोर्ट्स अकादमी) 134.5

हितांशी चौसी (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 128

वेदांती भुते (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 126

मुले :

ट्रॅडिशनल

श्रीराम सुपसांडे (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 128

ओम चौधरी (अमित स्पोर्ट्स अकादमी) 122.5

सम्राट डेलीकर (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 115

रिदमिक

विनय गोलाईत (नेहरू क्रीडा मंडळ) 211

कर्तव्य ठाकरे (अमित स्पोर्ट्स अकादमी) 211

सोहम भोगे (वायके ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट) 183

आर्टिस्टीक

श्रीराम सचिन सुपसांडे (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 142.5

ओम परसरामजी चौधरी (अमित स्पोर्ट्स अकादमी) 120

सम्राट डेलीकर (युनिटी स्पोर्ट्स असोसिएशन) 85

***

Age 13 to 15 years : Girls

Traditional

Shravani Rakhunde (Amit Sports Academy) 126.5

Yashika Barapatre (Unity Sports Association) 124.5

Vedanti Bhute (Unity Sports Association) 122

Rhythmic

Yashika Barapatre (Unity Sports Association) 254

Swarnika Naukkar (Amit Sports Academy) 206.5

Artistic

Shravani Rakhunde (Amit Sports Academy) 134.5

Hitanshi Chausi (Unity Sports Association) 128

Vedanti Bhute (Unity Sports Association) 126

Boys

Traditional

Sriram Supasande (Ekta Sports Association) 128

Om Chaudhary (Amit Sports Academy) 122.5

Samrat Dailykar (Unity Sports Association) 115

Rhythmic

Vinay Golait (Nehru Sports Board) 211

Duti Thackeray (Amit Sports Academy) 211

Soham Bhoge (Yk Group of Institutes) 183

Artistic

Sriram Sachin Supsande (Unity Sports Association) 142.5

Om Parasramji Chaudhary (Amit Sports Academy) 120

Samrat Delikar (Unity Sports Association) 85

Advertisement