Published On : Mon, Jan 22nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

मराठा लॉन्सर्स, साई स्पोर्टिंगला विजेतेपद खासदार क्रीडा महोत्सव : विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धा

Advertisement

नागपूर्. खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेतील ज्यूनिअर गटाच्या अंतिम लढतीत पुरूष गटात महाल येथील मराठा लॉन्सर्स संघ आणि महिला गटात साई स्पोर्टींग क्लब काटोल संघाने प्रतिस्पर्धी संघांना पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकाविले.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात पुरूष गटात मराठा लॉन्सर्स महाल संघाची लढत खामला येथील मराठा लॉन्सर्स संघासोबत झाली. या चुरशीच्या सामन्यात मराठा लॉन्सर्स महाल संघाने खामला संघाला 27-20 अशी मात देत 7 गुणांनी विजेतेपदाचे चषक उंचावले. तर ज्यूनिअर महिला गटात साई स्पोर्टींग क्लब काटोल संघाने नागपुरातील श्री गजानन क्रीडा मंडळाचा 36-28 अशा फरकाने पराभव करीत 8 गुणांसह स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुरूषांच्या उपांत्य फेरीत मराठा लॉन्सर्स खामला संघाने तरुण सुभाष सोनेगाव बोरी संघाला 49-30 अशी मात देउन अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर मराठा लॉन्सर्स महाल संघाने सुवर्ण भारत खापरखेडा संघाचा 32-28 असा पराभव करून खामला संघाचे आव्हान स्वीकारले होते. महिला ज्यूनिअर गटातील उपांत्य फेरीत साई काटोल संघाने रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड संघाचा 25-22 असा पराभव करीत अवघ्या 3 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान पक्के केले तर दुस-या उपांत्य फेरीतील सामन्यात गजानन क्रीडा मंडळ संघाने विक्रांत क्रीडा मंडळ नागपूर संघचा 58-53 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

सबज्यूनिअर्समध्ये शिवगर्जना, रेणूका ला अजिंक्यपद

सबज्यूनिअर्स गटामध्ये रामटेकच्या शिवगर्जना क्रीडा मंडळाने मुलांच्या गटात तर अजनी येथील रेणूका क्रीडा मंडळ संघाने मुलींच्या गटातील अजिंक्यपदावर नाव कोरले.

मुलांच्या गटात शिवगर्जना संघाने अंतिम फेरीत जय मातृभूमी उमरेड संघाचा 56-49 असा पराभव करून 7 गुणांनी विजय मिळविला. उपांत्य फेरीत शिवगर्जना संघाने हनुमान क्रीडा मंडळ काटोल संघाला 55-41 ने पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला तर मातृभूमी उमरेड संघाने साई काटोल संघाला 57-36 अशी एकतर्फी मात देत 21 गुणांच्या विजयासह अंतिम फेरी गाठली होती.

मुलींच्या गटात रेणूका क्रीडा मंडळ अजनी संघाने अंतिम लढतीत विक्रांत क्रीडा मंडळ नागपूर संघाचा 40-38 असा पराभव करीत 2 गुणांच्या विजयासह विजेतेपद पटकाविले. उपांत्य फेरीत रेणूका संघाने जय बजरंग नवेगाव संघाचा 57-24 ने तर विक्रांत संघाने विद्यार्थी युवक रघुजीनगर संघाचा 37-4 ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

Advertisement
Advertisement