नागपूर: प्रदूषणामुळे निसर्गाची होणारी हानी भरून काढणे शक्य नाही, पण वृक्षारोपण करून आपण वसुंधरेचे किमान संरक्षण करू शकतो. हा निर्धार करूनअसाच पावसाळ्यात समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य बजावत असताना तेथील नागरीक व दुकानदारांनी गिट्टीखदान जवळील शारदा माता चौक, येथे वृक्षारोपण करून वसुंधरा वाचवा असे आवाहन केले.
यात सलूनचे संचालक भगवान शर्मा, रमेश यादव, देवपरी पिकअप सेंटरचे संचालक सुशील सभवानी, टेलर कार्तिक मर्चतीवार, प्रकाश शेंडे, आकाश तिवारी, राजू तिवारी यांनी सहकार्य केले.
सर्व नागरिकांनी आपापल्या दुकानांच्या किंवा घराबाहेरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करून निसर्गाचे प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी प्रार्थना करून समाज व निसर्गाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.