नागपूर : अत्यंत वर्दळीच्या वर्धा रोडवर रोज ठिकठिकाणी वाहतुकीचे मोठे जाम लागत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने वर्धा रोडवर तात्पुरती वाहतूक नियमावली लागू केली आहे.
23 ते 28 सप्टेंबर असे पाच दिवस अजनी चौक ते मॉरिस कॉलेज टी पॉइंटकडे उजवे वळण घेण्यास प्रवाशांना मनाई करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वांची रूपरेषा देणारी अधिसूचना जारी केली.
चांडक यांनी स्पष्ट केले की, हा उपाय प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. वर्धा रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हे नियमन प्रभावी ठरल्यास ते कायमस्वरूपी ठरू शकते,असे सांगण्यात येत आहे.