नागपूर:राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी महविकास आघाडीचे सरकार असतानाचा एक किस्सा सांगत देवेंद्र फडणवीस मोठा गौप्यस्फोट केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करणारे प्रतिज्ञापत्र पाठवले होते. ते देण्यास नकार दिल्यानंतर माझ्या घरी ईडीची धाड पडली, असे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
एका दिवशी देवेंद्र फडणवीस यांचा मला फोन आला. ते म्हणाले की, ‘आम्ही तुम्हाला मदत करतो. काही कागद पाठवतो. तुम्ही बघून घ्या.’ त्यांची इच्छा होती की, महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी मी खोटी प्रतिज्ञापत्रे द्यावीत, असे देशमुख यांनी सांगितले. फडणवीस यांनी मला शरद पवारांवर आरोप करायला सांगितले होते. त्यात उद्धव ठाकरेंवर आरोप करायला सांगितले होते. त्यात आदित्य ठाकरेंवर आरोप करायला सांगितलेले होते.मात्र मी तसे केले नाही. हा किस्सा तीन वर्षांपूर्वीचा आहे. फडणवीस यांची ठाकरे सरकार पाडण्यासाठी धडपड सुरू होती.
मी ते प्रतिज्ञापत्र वाचले आणि त्याच्या तोंडावर फेकले आणि सांगितले की, अनिल देशमुख आयुष्यभर तुरुंगात जाईल, पण तुमच्यासोबत तडजोड करणार नाही. हा तीन वर्षांपूर्वीचा किस्सा आहे. ज्यादिवशी मी प्रतिज्ञापत्र द्यायला नकार दिला. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्या घरी ईडीची धाड पडली. माझ्या नकाराचा वाचपा काढण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. त्यांच्या या आरोपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Shocking!
Ex HM of Maharashtra Anil Deshmukh revealing facts pic.twitter.com/MtetV62EMh
— Gabbar (@Gabbar0099) May 23, 2024