मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीसाठी आज काळादिवस मानला जात आहे. कारण दोन लोकप्रिय कलाकाराच्या निधनाने मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘अनुपमा’ फेम अभिनेता नितेश पांडे यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. पांडे यांनी अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले ५१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
नितेश पांडे हे नाशिक येथील इगतपुरीजवळ शूटिंगसाठी गेले होते. मंगळवारी(२३ मे) रात्री हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. नितेश पांडे यांच्या पत्नीचा भाऊ व निर्माता सिद्धार्थ नगर यांनी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
तर दुसरीकडे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे निधन झाले आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. ती ३२ वर्षांची होती.वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला.
हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला कारचे यंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातानंतर त्यांची कार थेट दरीत कोसळली. वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
टीव्ही इंडस्ट्रीतल्या या दोन प्रसिद्ध कलाकारांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.