मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. काल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडिओ व्हायरल प्रकरणी विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. विधानभवानच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी दिल्या.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकाचा धिक्कार असो, सोमय्या यांना सुरक्षा देणाऱ्या सरकारच्या धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.
दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. बी बीयाणे आणि खते यांच्या किमतीत वाढ यासह शेतकऱ्यांशी निगडीत अनेक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील महीला मुलींवर आत्याचाराच्या प्रकरणात वाढ, औरंगाबाद दंगल प्रकरण, शिवशाही बसला अचानक लागणाऱ्या आगीच्या घटना आणि सातारा जिल्ह्यातील सामुहिक बलात्कार प्रकरणावरून सभागृहात आज गोंधळ होऊ शकतो.