नागपूर : शहरात पुन्हा टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे दर २०० रुपये प्रतिकिलो इतके झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे भाव वाढल्याने टोमॅटो घेणार्या ग्राहकांची संख्या रोडावली आहे. भाज्यांचे भाव पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कडाडल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
दरम्यान टोमॅटो हा रोजच्या जेवणातला महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, 200 रुपयांत पूर्ण बाजार होण्याऐवजी आता केवळ टोमॅटोच 200 रुपये दराने घ्यावा लागत आहे. पावसाळा सुरू होताच शेतीच्या हंगामाला सुरुवात होते.
या काळात भाजीपाल्याचे पीक घेण्याऐवजी हंगामी पीक घेण्यावर शेतकर्यांचा भर असतो. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक अत्यंत कमी होते आणि किंमतीत वाढ होते.