नागपुर: बहुजन समाज पार्टी नागपुर शहर च्या वतीने उद्या 10 सप्टेम्बर ला सकाळी 12 वाजता, जरीपटका पोलीस स्टेशन मागील, मातेश्वरी सभागृह, नारारोड, उत्तर नागपूर, येथे “कार्यकर्ता सम्मेलन व मार्गदर्शन शिबीर” चे आयोजन केलेले आहे.
तसेच 11 सप्टेम्बर ला दुपारी 1 वाजता उमरेड येथील जुना मोटर स्टैंड जवळील दुर्गास्टेज वर नागपुर जिल्हा ग्रामीण मधील “कार्यकर्ता प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबीर” चे आयोजन केलेले आहे.
या दोन्ही कार्यकर्ता सम्मेलन मधे बसपा चे राष्ट्रीय महासचिव, उत्तर प्रदेश चे माजी कॅबीनेट मंत्री बसपा चे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रामअचलजी राजभर, बसपा चे राष्ट्रीय महासचिव, राज्यसभा खासदार व महाराष्ट्र प्रदेश बसपा चे प्रभारी डॉ अशोकजी सिध्दार्थ, बसपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेशजी साखरे, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णाजी बेले व प्रदेश कोषाध्यक्ष दयानंदजी किरतकर आदी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करतील.
या प्रसंगी नागपुर झोन चे इंचार्ज मंगेशजी ठाकरे, जितेंद्रजी म्हैसकर, प्रा भाऊसाहेंब गोंडाने, तसेच जितेन्द्र घोडेस्वार, रुपेश बागेश्वर, प्रफुल्ल मानके, उत्तम शेवड़े, किशोर कैथेल, अड़ राजकुमार शेंडे, त्रिभुवन तिवारी, जिल्हा इंचार्ज उषाताई बौद्ध, नरेश वासनिक, राजकुमार बोरकर, संदीप मेश्राम, मनपा पक्षनेत्या वैशाली नारनवरे उपस्थित राहतील.
बसपा नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यातिल सर्व विधानसभा, प्रभाग, सेक्टर, बुथ पदाधिकारी, बिव्हिएफ़, भाईचारा, नगरसेवकानी जास्तित जास्त संख्याने उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्ष महेश सहारे व जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर ह्यांनी केले.