Published On : Tue, Apr 24th, 2018

उद्या ध्वनिप्रदूषण जनजागृती दिवस; आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नो हाँकिंग डे’ बोधचिन्हाचे अनावरण

Advertisement

मुंबई : दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातील बुधवारी ध्वनी प्रदूषण जनजागृती दिवस साजरा केला जातो. यावर्षी कान, नाक, घसा तज्ञांच्या संघटनेमार्फत उद्या दि. २५ एप्रिल रोजी हा दिवस साजरा करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय डोईफोडे , डॉ. कौशल सेठ, डॉ. योगेश दाभोळकर, डॉ. अदीप शेट्टी आदी उपस्थित होते.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी आरोग्यमंत्री व उपस्थितांनी मुंबई शहर ध्वनी प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. अनावश्यक तसेच कर्णकर्कश्श हॉर्न वाजवू नये. तसे केल्यास त्याचा विपरित परिणाम मानवाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सर्वांनी ध्वनी प्रदूषण मुक्ततेसाठीच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

जागतिक ध्वनी प्रदूषण जनजागृती दिनी मुंबई शहराला ध्वनी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उद्या दिनांक 25 एप्रिल 2018 रोजी दुपारी 1 ते 2 या कालावधीत ‘नो हाँकिंग डे’ साजरा करण्यात येणार आहे.

ध्वनी प्रदूषणामुळे मानवी शरीरावर वाईट परिणाम होत असून यामुळे चिडचिडेपणा, बहिरेपणा, रक्तदाब, ह्दयविकार यासारखे आजार उद्भवतात. विशेषत: लहान मुले व गर्भवती महिलांवर ध्वनी प्रदूषणाचा विपरित परिणाम होतो. हे सर्व टाळण्यासाठी मुंबई शहरात जनजागृती करण्यासाठी नो हाँकिंग डे साजरा करण्यात येत आहे. त्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement