नागपूर : राज्यात मान्सूननंतर अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आता ‘सायकल सफारी’चा आनंद घेता येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे ही राज्यातील पहिली जंगल सायकल सफारी असणार आहे. विशेष म्हणजे या सायकल सफारीदरम्यान पर्यटकांसोबत मार्गदर्शक (गाईड) देखील मिळणार आहे. पर्यटकांकडून सध्या या सायकल सफारीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पात कोलीतमारा ते कुवाराभिवसेन दरम्यान तब्बल 48 किमी लांबीची “चितल सायकल सफारी” पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली आहे.जंगलात एखादी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला कसे सामोर जायचे यासाठी हे मार्गदर्शक गाईड पर्यटकांसोबत असणार आहेत.
पर्यटकांना असा घेता येणार सायकल सफारीचा आनंद ?
– कोलितमारा ते कुवारा कुवाराभिवसेन अशी एकूण 48 किलोमीटर चे अंतर
-निसर्गरम्य वातावरणात घनदाट जंगलातून सायकल सफारीचा ट्रेक असल्याने ही आरोग्यदायी सफारी
– 48 किलोमीटरच्या सफारी दरम्यान हरीण, चितळ, सांभार सारखे तृणभक्षी, विविध प्रजातीचे पक्षी, फुलपाखरू, कीटक आणि नशीब चांगले असल्यास वाघ ही पाहायला मिळेल
– सायकल सफारीसाठी वन विभाग 300 रू दराने अत्याधुनिक सायकल देणार
-स्वतःची सायकल वापरायची असल्यास 100 रुपये दर
– सोबत वायरलेस सेट, प्रथमोपचार किट, आणि अत्यावश्यक वस्तूंसह प्रशिक्षित गाईड ही राहणार
-सायकल सफारीच्या मार्गावर अनेक आदिवासी गाव त्या ठिकाणी रिफ्रेशमेंट घेता येणार आहे.