कन्हान : -नागपुर पॉवर (खंडेलवाल) फेरो कंपनीचा मँग्नीज स्लॉक दगड ट्रक्टर ट्राली मध्ये भरून अवैधरित्या चोरून नेताना पकडुन ३लाख १४हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .
रविवार दुपारी १.३० वाजता सिहोरा रोड वरील नागपुर पावर (खंडेलवाल) फेरो कम्पनीचा ८ टन मँग्नीज स्लैक दगड अवैधरीत्या बिना नंबरच्या ट्रक्टर ट्राली मध्ये भरून चोरून नेताना पकडले.
पोलीस सुत्रानुसार नागपुर पॉवर (खंडेलवाल) फेरो कम्पनीचे एच ओ डी तुषार चंद्रकांत सांवत पेट्रोलिंग करित असताना त्याच्या परिसरात सिहोरा ते एम जी नगर रोडवर एका बिना नंबर च्या ट्रैक्टर ट्रॉली मध्ये मँग्नीज स्लैक दगड अवैधरित्या भरून चोरून नेताना दिसुन आल्याने एच ओ डी सांवत यांनी थाबविले असता ते पसार झाले त्यात एक व्यक्ति रोशन पात्रे ही होता .
पोलीसाना दिल्यावर ८ टन स्लॉक दगड किमत ३२ हजार रुपये व ट्रैक्टर ट्रॉली किमत २ लाख ८२ हजार रुपये असा एकुण ३लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन कन्हान पोलीसांनी दोन फरार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.