Published On : Tue, May 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग, हंम्पयार्ड रोड, आनंद टॉकीज रोडवरील वाहतूक बंद

मनपा आयुक्तांचे आदेश : 31 ऑक्टोबर पर्यंत राहणार वाहतूक प्रतिबंधित
Advertisement

नागपूर महानगरपालिका द्वारा सिमेंट कॉक्रीट रोडच्या बांधकामासाठी मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता, हंम्पयार्ड रोड ते लोकमत चौक (बलराज मार्ग) आणि आनंद टॉकीज ते धंतोली पोलिस स्टेशन (पूलापर्यंत) वाहतूक बंद करण्याचे आदेश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निर्गमित केले आहे. तीनही मार्गावरील वाहतूक येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधित राहणार आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या आदेशानुसार, मनपाद्वारे रस्ता क्र. ३३ मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. रस्ता क्र. ३३ मधील मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्त्यावरील श्री. गर्ग यांच्या घरापासून श्री. सुदाम यांच्या घरापर्यंत व मैदानापासून ते श्री. घुले यांच्या घरापर्यंत रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित करून संपूर्ण मार्ग पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. याशिवाय रस्ता क्र. २ हंम्पयार्ड रोड ते लोकमत चौक (बलराज मार्ग) हा मार्गावरील क्र. ८ खरे मार्ग, धंतोली विजयानंद सोसायटी ते दीनानाथ शाळे पर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. या कामाकरिता रस्ता क्र. २ हंम्पयार्ड रोड ते धंतोली उद्यानाच्या पूर्व दक्षिण कोपऱ्यापर्यंत विजयानंद सोसायटी ते धंतोली उद्यानाच्या पूर्व-दक्षिण कोपऱ्यापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक प्रतिबंधित असणार आहे.

तसेच रस्ता क्र. २२ आनंद टॉकीज ते धंतोली पोलिस स्टेशन (पूलापर्यंत) पर्यंत सिमेंट कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले असून, आनंद टॉकीज ते धंतोली पोलिस स्टेशन पर्यंत सदर रस्त्याचे डाव्या बाजूचे काम सुरु करुन सदर रस्त्यावरील वाहतूक त्याच रस्त्याचा उजव्या बाजूने दुतर्फा जाईल व डाव्या बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सदर रस्त्याची उजवी बाजूचे काम सुरू करुन वाहतूक डाव्या बाजूस दुतर्फा जाईल’ अशाप्रकारे रस्ता वळविण्यात येणार आहे.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या आदेशानुसार या तीनही रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी सूचना फलक व काम सुरू केल्याची/काम पूर्ण करण्याची दिनांक नमूद करावे. तसेच कंत्राटदाराने स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला बोर्ड लावावा. पर्यायी मार्ग सुरू होतो, त्याठिकाणी दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले वाहतुक सुरक्षा रक्षक / स्वयंसेवक नेमावे. काम सुरू झाल्यानंतर जमिनीतुन निघणारे मटेरियल उदा. माती, गिट्टी, पेव्हर ब्लॉक, वगैरे मुळे घसरण निर्माण होवून वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे रस्त्यावर टाकु नये. त्याकरिता विशेष व्यवस्था करण्यात यावी. मार्गावरील रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजवून त्यावर सिमेंटीकरण / डांबरीकरण करून रोड पूर्ववत करावा. पर्यायी मार्ग सुरू होतो, त्याठिकाणी व काम करणार आहे. त्या मार्गाचे बाजुला लोकांना दिसेल अशा ठिकाणी पर्यायी मार्गाबाबत (वळण मार्ग) सविस्तर माहिती असणारे फलक लावण्यात यावेत. रात्रीचे वेळी वाहनचालकांना माहितीकरिता एलईडी डार्यव्हर्सन बोर्ड लावणे आवश्यक आहे. बॅरीकेटींगवर एलईडी माळा लावणे आवश्यक आहे, काम सुरू असतांना अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलीसांनी दिलेल्या दिशा-निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांच्या सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. असे आदेशात नमूद केले आहे.

Advertisement