नागपूर : शहरात महापालिका हद्दीत विविध सिमेंट मार्गाच्या बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे. महानगरपालिकेकडून सिमेंट मार्गाच्या बांधकामासाठी मनिष नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता व महादेव मंदिर रस्ता, हंम्पयार्ड रोड ते लोकमत चौक (बलराज मार्ग) आणि आनंद टॉकीज ते धंतोली पोलिस स्टेशन (पूलापर्यंत), देव नगर चौक ते स्वामी विवेकानंद चौक ते गजानन नगर, भारत पेट्रोल पंप (जॉगर्स पार्क – सावरकर गार्डन) फुटबाल गाऊंड पर्यंत, जय दुर्गा ट्रेवर्ल्स ते आरबीआई कॉलोनी, जयप्रकाश नगर, न्यू स्नेह नगर खामला रोड ते मालवीय नगर, निरी रोड ते आठ रस्ता चौक या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात यावी असे आदेश नागपूर महानगर पालिकेकडून देण्यात आले आहे. या रस्त्यावरील सर्व वाहतुक दुसरीकडे वळविण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेकडून कंत्राटदारांना विशेष सूचना-
ज्या रस्त्याचे बांधकाम,सुरु आहे त्याठिकाणी कंत्राटदाराला काम करणाऱ्या मार्गावर स्वतःचा पत्ता व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक असलेला फलकही लावायचा आहे. इतकेच नाही तर पर्यायी मार्गावर दोन्ही टोकावर तसेच बॅरीकेटस जवळ रोडवर आपले सुरक्षा रक्षक / स्वयंसेवक नेमणे गरजेचे आहे. तसेच काम सुरू असतांना अनुचित प्रकार घडल्यास कंत्राटदार स्वतः जबाबदार राहतील. वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलीसांनी दिलेल्या दिशा- निर्देशाचे पालन करावे. या रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरीकांच्या सोयीकरिता आवश्यक अशी व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी,असे निर्देश महापालिकेने कंत्राटदाराला दिले आहेत.