Advertisement
नागपूर : महाराष्ट्रातील नागपूर येथे आज रेल्वे अपघात झाला. हा अपघात नागपूरच्या सुभाषचंद्र बोस रेल्वे स्थानकाजवळ घडला, जिथे मुंबईहून शालिमारकडे जाणारी ट्रेन रुळावरून घसरली.त्यामुळे दोन डब्बे रुळावरून घसरले.
ज्यात S2 आणि S4 डब्ब्यांचा समावेश होता. या दोन्ही डब्ब्यात प्रवाशी होते.
माहितीनुसार ही गाडी 2 वाजता रेल्वे स्थानकातून निघून रुळ बदलण्यास सुरुवात करत असतानाच दोन ठिकाणी रुळावरून घसरली. त्यामुळे हा अपघात घडला, सुदैवाने ट्रेनचा वेग खूपच कमी होता. त्यामुळे मोठी घटना घडली नाही.
तसेच सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर लगेचच पोलीस आणि पथक मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले.