– स्थानिक गाड्यातील प्रकार
नागपूर: जनरलच्या प्रवाशाने आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास त्याच्यावर नियमानूसार कारवाई केली जाते. परंतु जनरलच्या प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात कुली आपला हक्क दाखवून बर्थ विकत असतील तर … त्यांच्यावर कोणी कारवाई करावी. असाच काहीसा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळत आहे. प्रवाशांचे ओझे गाडीपर्यंत पोहोचविण्याचे काम करता करता आता बर्थही विकायला लागले आहेत. त्यामुळे जनरलच्या प्रवाशांसाठी हक्काचे बर्थ हिरावल्या जात असल्याने प्रवाशांत संतापाची लाट आहे. हा सर्व प्रकार स्थानिक गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावरील कुली बांधव वेळ प्रसंगी हातचे काम सोडून अडचनीत सापडलेल्या प्रवाशांच्या मदतीला धावून जात असल्याने शहरात चांगली प्रतिमा तयार झाली. त्यांनी अनेकांची आर्थिक मदत केली. भरकटलेल्या चिमुकल्यांचा शोध घेवून कुटुंबीयांच्या सुपूर्द केले. एवढेच काय तर जखमीला रुग्णालयात पोहोचविण्याचेही काम केले. मानवी दृष्टीकोणातून केल्या जाणाèया या मदतीचे नेहमीच कौतूक होते. मात्र काही कुलींनी सीट विक्रीचे काम करून त्यांच्या चांगल्या कामावर पाणी फेरले.
काही निवडक कुली प्रवाशांची गरज लक्षात घेऊन अधिक दराची आकारणी करतात. कधी ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे देण्यासाठी प्रवाशांची अडवणूकही केली जाते. रेल्वेगाड्यांमधील गर्दी असताना कुलींकडून जनरल डब्यातील जागा अडवून त्याची विक्रीही केली जात आहे. पूर्वी फारच गर्दी असल्यास सीट विक्रीचा प्रकार व्हायचा. पण, ही बाब आता सर्रास झाली आहे. विशेषत: नागपूर स्थानकावरून सुटणाèया गाड्यांमध्ये हा प्रकार नित्याचाच झाला आहे. जनरल डब्यातही सीट मिळविण्यासाठी प्रतिसीट किमान दोनशे रुपये प्रवाशांना मोजावे लागत आहे. वाद नको म्हणून प्रवासी या प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. जाण्याची घाई असल्याने तक्रार करण्याच्या भानगडीतही कुणी पडत नाही.
‘दुपट्टाङ्क टाकून जागा अडकवितात
देशातल्या कुठल्याही रेल्वे स्थानकावर कुलींना कुणीही अडवीत नाही. याचाच फायदा काही जण घेतात. गाडी यार्डमध्ये असताना सर्व गेट बंद असतात. तेव्हाच जनरल डब्यात ‘दुपट्टाङ्क टाकून जागा अडविली जाते. रेल्वे फलाटावर येताच सर्वप्रथम कुली आत चढून जागेवर ताबा मिळवितात.
‘सेवाग्रामङ्कमध्ये सर्वाधिक अडचण
नागपूरहून सुटणाèया बहुतेक गाड्यांमध्ये हा प्रकार घडतो. त्यातही नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार सर्वाधिक घडतो. त्या पाठोपाठ पुण्याकडे जाणाèया गाडीचा नंबर लागतो. तर काही नागपूर मार्गे जाणाèया विशिष्ट गाड्यातही होते.