सेवाग्राम, शालीमार आणि केरळ एक्स्प्रेसमधून चोरी
धावत्या रेल्वेत आरपीएफ आणि जीआरपीचे कर्मचारी स्कॉटिंगवर असतात. हल्लाबोल पथकही गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेऊन असते. याशिवाय रेल्वे स्थानकाच्या कानाकोपºयात अत्याधुनिक सीसीटिव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. यानंतरही चोरांना भीती वाटत नाही. दिवसेंनदिवस चोºयांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या चोºयांमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. चोरट्यांनी सेवाग्राम, शालीमार आणि केरळ एक्स्प्रेसवर धुमाकूळ घालून प्रवाशांचे मोबाईल आणि साहित्य चोरले.
प्रकाश रामलाल गौतम (३३, रा. गोंदिया) हे १३ मे रोजी सेवाग्राम एक्सप्रेसने मुंबई ते नागपूर असा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान एस-७ बोगीत असताना त्यांना झोप लागली. ही संधी साधून अज्ञात चोरट्यानी त्यांची बॅग लंपास केली. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर झोपी उघडली असता, त्यांना बॅग दिसून आली नाही. ट्रॉलीबॅगमध्ये ३६ हजार रुपये किंमतीचा काळ्या रंगाचा मोबाईल, १३ हजार रुपये किंमतीचा कॅल्क्युलेटर, ड्रायफूड, चॉकलेट, ५ हजार रुपये किंमतीचे कपडे, कॉस्मेटिक सामान असा एकून ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
दुसरी घटना शालीमार एक्स्प्रेसमध्ये ९ मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. राहुल हीरामनजी (२८, रा., कन्हान नागपूर) असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. राहुल हा शालीमार एक्सप्रेसने कामठी ते गोंदिया असा प्रवास करीत होता. जनरल बोगीत असल्याने प्रचंड गर्दी होती. यासंधीचा फायदा घेत त्याचा १५ हजार ९९० रुपये किंमतीचा मोबाईल लंपास करण्यात आला. या प्रकरणी इतवारी लोहमार्ग पोलिस ठाणे यांनी तक्रार नोंदविली.
तिसरी घटना केरळ एक्स्प्रेसमध्ये १३ मे रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास जनरल बोगीत घडली. प्रवीण विलीयन असे फिर्यादी प्रवाशाचे नाव आहे. प्रवीण हे पालकड ते नवी दिल्ली असा प्रवास करीत होते. ते साखर झोपेत असताना असताना त्यांची लॅपटॉप बॅग लंपास करण्यात आली. यामध्ये ३७ हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप, बँकेचे एटीएम, पीएफ पेपर्स, मोबाईल असा कएून ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमला चोरुन नेला. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.