नागपूर : पोलीस आयुक्तांच्या सुचनेनुसर शहर पोलीस दलाअंतर्गत १० वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.या बदल्यांमुळे शहरातील सात पोलीस ठाण्यांना नवीन ठाणेदार मिळाले.
‘या’ पोलीस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या-
यादीनुसार विशेष शाखेचे हेमंत चांदेवार यांची लकडगंज पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बदली झाली आहे. तर राणाप्रतापनगरचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) हरीशकुमार बोराडे यांची वाठोडा पोलीस स्टेशमध्ये बदली करण्यात आली.
विशेष शाखेतील महेश सागळे यांची राणाप्रतापनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे. सदरचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण क्षीरसागर यांना जरीपटक्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष शाखेतील महेश आंधळे हे कपिलनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार झाले आहेत. तर यशोधरानगरचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्याकडे हुडकेश्वर ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हुडकेश्वरचे ठाणेदार कैलास देशमाने यांची गिट्टीखदानचे ठाणेदार म्हणून बदली झाली आहे. तर गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद कालेकर यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. विशेष शाखेचे अनिल कुरळकर यांची मानव संसाधन शाखेत व गुन्हे शाखेतील अरविंद महर्षी यांची वाहतूक शाखेतील अपघात सेलमध्ये बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.